चंद्रपुर :- टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनात विशेष कर्कराेग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात 60 महिला कर्मचाऱ्या ची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रक्तदाब, मधुमेह, हेपाटायटीस, मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोग ची तपासणी करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मनीषा घाटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पराग जीवतोडे, एनसीडी कन्सल्टंट बोरकर उपस्थीत होते.
यावेळी टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. आशिष बारब्दे, जिल्हा समन्वयक सूरज साळुंके व संपूर्ण टीम उपस्थित होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर यांनी महिला कर्मचारी यांना मार्गदर्षण केले व सर्वांनी तपासणी करून घेण्याबाबत आवाहन केले.
सदर शिबिरात उपस्थितांना स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर घाटे यांनी स्तन आणि गर्भाशय कर्कराेगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले तसेच कर्करोगाच्या लक्षणा विषयी, हा आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले व उपचारा विषयी माहिती देण्यात आली. डाॅ. आशिष बारब्दे यांनी प्रास्ताविकातून या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला.
0 comments:
Post a Comment