Ads

एकोणा विस्तारीकरण प्रकल्पग्रस्तां च्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मार्गी .

चंद्रपूर :-
वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा विस्तारीकरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रभावीपणे हस्तक्षेप केल्यामुळे यशस्वी मध्यस्थीतून अखेर मार्गी लागला आहे. वेकोलिच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातील सुमारे 850 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या जानेवारी 2022 पासुन नोकरी देण्याचे लेखी स्वरूपात मान्य केल्याने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे.
एकोणा विस्तारीकरण प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी संपादीत करण्यात आल्या होत्या. या जमीनीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या सिंचीत जमीनीचा समावेश असल्याने तहसिलदार वरोरा यांनी वेकोलि प्रबंधनास सिंचीत विषयक अहवाल सादर केला होता परंतू वेकोलिने तो नाकारला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना सात दिवसात अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले होते मात्रा 7-8 महिने लोटुनही अहवाल सादर न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये चिड व्यक्त होत होती. हे प्रकरण त्वरीत मार्गी लावावे तसेच प्रकल्पग्रस्तांना आधी नोकÚया द्याव्यात नंतरच प्रकल्पास सुरूवात करावी अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी असतांना वेकोलि प्रबंधनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून कामास सुरूवात केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्यांनी दि. 28 आॅक्टो. 2021 रोजी चक्काजाम आंदोलनाचे हत्यार उपसुन बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या व हक्कासाठी या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मध्यस्थी करीत वेकोलि मुख्यालय तसेच माजरी क्षेत्राच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा करून संबंधीत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी अहीर यांच्या उपस्थितीत सुमारे 850 भूमिधारकांना जानेवारी 2022 पासुन नोकऱ्या बहाल करण्याचे व उर्वरीत मोबदला देण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच रोजगाराऐवजीच्या मोबदल्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे 10 नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे मान्य केले. जिल्हाधिकाऱ्यांकडुन परवानगी मिळाल्यानंतर 20 दिवसाच्या आत प्रस्ताव मंजुरीकरीता वेकोलि मुख्यालयास पाठविण्याचेही संबंधीत अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात मान्य केले. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन त्यांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.
या चर्चेत हंसराज अहीर यांचेसह धनंजय पिंपळशेंडे, चंद्रशेखर पहापळे, शुभम गेघाटे, उमेश आवारी, स्वप्नील पिंपळकर, शंकर देरकर, मार्डाचे सरपंच बालाजी जोगी, उपसरपंच बालाजी कांबळे, वेकोलि मुख्यालयाचे अधिकारी श्री. रेवतकर, श्री. गोस्वामी, माजरी जीएम आॅपरेशन, उपक्षेत्राीय प्रबंधक, एरीया प्लानींग आॅफीसर आदींचा समावेश होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment