घुग्घुस (प्रतिनिधी) :- येथे शनिवारी रात्री एकाच दिवसात चार घरे फोडून चोरट्यांनी 28 हजारांची रोकड व चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाली नगरतील प्रमोद उपाध्याय यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली 28 हजारांची रोकड, चांदीचे दागिने रघुनाथ वानखेडे यांच्या घरातून चोरून नेले. याच म्हातारदेवी येथील रहिवासी डॉ. सुनील दुधे व मुन्ना मेश्राम यांच्या घरातून चोरट्यांना काहीही मिळाले नाही.
दिवाळीत सतर्क राहण्याचा संदेश पोलिसांकडून देण्यात आला. चार घरांना कुलूप असून ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी वेकोलि वसाहत येथेही एकाच दिवसात चार घरफोड्या झाल्याची घटना घडली होती. मात्र आजतागायत आरोपी पकडले गेले नसल्याने पुन्हा घरफोडीच्या घटनेने परिसर दणाणला आहे.
असुरक्षिततेचे वातावरण आहे. माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वानपथक आणण्यात आले. चोरट्यांच्या शोधात दोन्ही घटनांतील आरोपी एकच आहेत का, हा चर्चेचा विषय राहिला आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
0 comments:
Post a Comment