भद्रावती शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपावली स्नेह मिलन सोहळा व भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत येथील भाजी मार्केटमधील राजवंदन सभागृहात दीपावली स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खा. बाळुभाऊ धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी १० वाजेपासून रुग्ण नोंदणी सुरु होणार असून १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. दि.११ व १२ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहे.
शिबिरात फिजिशियन, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, दंतचिकित्सक, नाक, कान व घसा तज्ज्ञ तपासणी करणार आहेत. तसेच शिबिरात हायड्रोसिल, हर्निया व शरीरावरील गाठी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शालेय मुलांची आरोग्य तपासणीही शिबिरात करण्यात येणार आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यांची तपासणी करुन निदान करण्यात येणार आहे. शिबिरात रुग्णांना उपलब्ध औषधी मोफत देण्यात येणार आहे. तसेच शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार आहेत.
शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी आरोग्यविषयक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर तसेच नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.Sneha Milan ceremony and grand health camp organized
0 comments:
Post a Comment