दिवाळीच्या सुट्टीत बालगोपालांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करण्याची सेवा देण्याकरिता मागील १२ वर्षांपासून जीएमडी मनोरंजन पार्क चे आगमन होत असून यंदाही नुकतेच आगमन झाले आहे.
येथील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर दरवर्षी प्रमाणे यंदाही जीएमडी मनोरंजन पार्क भद्रावतीकरांच्या मनोरंजनाच्या सेवेत दि.४ नोव्हेंबरपासून रुजू झाले आहे. हे पार्क भद्रावतीकरांना एक महिना सेवा देऊन निरोप घेणार आहे.
या मनोरंजन पार्कमध्ये आकाश झुला, कोलंबस झुला, ब्रेक डाॅन्स झुला, बच्चे कंपनीकरीता बोटींग, विविध प्रकारचे खेळ, खाऊ, पाॅपकन, शुगर कॅन्डी, भेळ, चाट, पाणी पुरी यांच्यासह इतर खाद्यपदार्थ, गनशुटींग, विविध खेळण्या व इतर वस्तुंची दुकाने लागली आहेत. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पार्कमधील मनोरंजन मेळ्याची वेळ असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन मेळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मेळ्याचे आयोजक अरुण गोस्वामी यांनी केले आहे.
विशेष म्हणजे चांदा आयुध निर्माणीतील मेळा काही वर्षापासून बंद असल्याने या मेळ्याला भद्रावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
0 comments:
Post a Comment