Ads

चंद्रपूर तालुक्‍यातील अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्‍याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी : आ. सुधीर मुनगंटीवार

८ नोव्हेंबर नवी दिल्ली:-
चंद्रपूर तालुक्‍यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्‍या माध्‍यमातुन शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्‍याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली. सदर शेतकरी प्रशिक्षण केंद्र त्वरित सुरू करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांना दिले.
वरील मागणी संदर्भात आ सुधीर मुनगंटीवार यांनी दि. 8 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेत चर्चा केली व निवेदन सादर केले.

या सम्बंधीच्या प्रस्‍तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍टतर्फे दिनांक 27 सप्‍टेंबर 2018 रोजी मान्‍यता देण्‍यात आली आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अजयपूर येथील 4.34 हे.आर जमिनीवर सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्‍त असे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याशी चर्चा करून चंद्रपूर जिल्‍हयात अजयपूर येथे सदर प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्‍याची मागणी केली.
आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍ट च्‍या माध्‍यमातुन अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला . या केंद्रासाठी अजयपूर येथील 8 ते 10 एकर जागा उपलब्‍ध करून देण्‍याबाबत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍टने केलेल्‍या विनंतीच्‍या अनुषंगाने राज्‍य मंत्रीमंडळाने दिनांक 6 एप्रिल 2017 रोजी मान्‍यता दिली आहे. अजयपूर येथील सर्व्हे न. 26, 27 व 312 एकुण आराजी 5.58 हे. आर पैकी 4.34 हे. आर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्‍यात आली आहे. शासनाला प्राप्‍त अधिकारानुसार 30 वर्षासाठी वार्षीक नाममात्र रू. 1 दराने भुईभाडे आकारारून नियमित अटी व शर्तीवर भाडे पट्टयाने जमीन देण्‍यात यावी व सदर भाडे पट्टयाचे त्‍याच तत्‍वावर नुतनीकरण करण्‍याची तरतूद भाडे पट्टयात अंतभुर्त करण्‍यात यावी असा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने घेतला आहे. राज्‍य मंत्री मंडळाच्‍या निर्णयानंतर पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍टकडे सविस्‍तर प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला होता. या प्रस्‍तावाला ट्रस्‍टने मान्‍यता दिली आहे.

शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिला यांचा कौशल्‍य विकास घडवून आणि सामाजिक, आर्थीक क्रियाकलापांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे अधिकाधीक कल्‍याण साधण्‍याच्‍या उद्देशाने पंजाब नॅशनल बँकेने पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍ट ही संस्‍था स्‍थापित केली आहे. या संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन देशातील विविध 11 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आलेली असुन या केंद्रात कौशल्‍य विकास आणि स्‍वयंरोजगाराच्‍या माध्‍यमातुन दारिद्रय निर्मुलन व्‍हावे यादृष्‍टीने शेतकरी, ग्रामीण युवक व महिलांना निवासी व्‍यवस्‍थेसह विना‍मुल्‍य प्रशिक्षण पुरविण्‍यात येते.या शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत शेतक-यांना गावामधुन केंद्रामध्‍ये येण्‍यासाठी निःशुल्‍क प्रवास, महिला व ग्रामीण युवक तसेच युवतींना शेती व शेतीसंबंधातील कामे, संगणक अभ्‍यासक्रम, ड्रेस डिझायनिंग व भरतकाम इ. चे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. शेतकरी प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी गावांना वारंवार भेटी देवून किसान क्‍लब निर्माण करतील आणि शेतक-यांच्‍या घरात किसान गोष्‍ठींचे आयोजन करण्‍यात येणार आहे. दत्‍तक घेतलेल्‍या गावांमध्‍ये मॉडेल म्‍हणून गाव विकसित करण्‍यासाठी विकास कार्यक्रम हाती घेणे, सार्वजनिक सुविधा उपलब्‍ध करणे, वर्गखोल्‍यांची निर्मीती, वाचनालये, दवाखाने आदी सोयी उपलब्‍ध करणे, स्‍वयंसहाय्यता गटांना उत्‍तेजन देणे अशी सर्व कार्ये करण्यात येणार आहे.या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात एक निवासी कक्ष, तीन वर्गखोल्‍या, दोन संगणक कक्ष, एक ट्रॅक्‍टर दुरूस्‍ती कार्यशाळा, एक कार्यालय, एक संचालन कक्ष, एक वाचनालय, एक मनोरंजन कक्ष, एक स्‍वयंपाकघर, एक भोजन कक्ष, एक माती परीक्षण प्रयोगशाळा, एक ट्रॅक्‍टर कार्यशाळा, एक शेती उपकरणांसाठी साठवण कक्ष, मोबाईल व्‍हॅन, जीप यांच्‍या दोन गॅरेज, एक अतिथी कक्ष, बैठया खेळांसाठी एक कक्ष असे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे स्‍वरूप राहणार आहे. या केंद्रात पॉलीहाऊस, फळबाग, पुष्‍प संवर्धन या कार्यक्रमांसह गांडूळ खत, मधमाशी संगोपन, अळंबी शेती, मत्‍स्‍यतळे, सुगंधी औषधी वनस्‍पती लागवड, भाज्‍या मशागत आदी प्रात्‍याक्षीके करण्‍यात येणार आहे. कर्ज, ठेवी बाबतच्‍या योजना, आर्थिक समावेशनाबाबत जागरूकता निर्माण करणे आदी उपक्रमांवर या केंद्राच्‍या माध्‍यमातुन भर देण्‍यात येणार आहे अशी विस्तृत माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना दिली. या संदर्भातील कार्यवाही त्वरित पूर्ण करून सदर शेतकरी प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू करावे असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांना दिले.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील अजयपूर येथे उभारण्‍या येणा-या या शेतकरी प्रशिक्षण केंद्रामुळे शेतकरी सक्षम व स्‍वयंपूर्ण होण्‍याच्‍या प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment