मोरवा येथील समीर जगदीश सिडाम हा युवक क्रिकेट खेळून घरी परतत असताना समीरचा अपघात झाला. या अपघातात त्याला पायाला, कंबरेला गंभीर दुखापती झाल्यात. त्याला उपचारार्थ डॉ. टोंगे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पायाचे ऑपरेशन झाले आहे. यासाठी उपचारासाठी खर्च अधिक येत होता. नातेवाईकांनी दिलेले पैसे सुध्दा संपले होते. समीरच्या मित्राची समाज माध्यमावर मदतीचे आवाहन केले होते. ही माहिती संस्थेच्या सदस्यांना होताच संस्थेच्या सर्व सदस्यांनी समीरची घरची परिस्थिती बेताची असल्याने मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी (ता. ८) डॉ. टोंगे हॉस्पीटलमध्ये जाऊन त्याच्या आईकडे २१ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यासोबत मेडीकल बिलमध्ये सुट मिळवून देण्याचे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजणे, उपाध्यक्ष किशन नागरकर, हितेश गोहोकार, महेंद्र बांदूरकर, ईश्वर घिवे, बंटी तितरे, दिनेश दिवसे आदींची उपस्थिती होती.
*अनेकांना मदतीचा हात*
नाते आपुलकीचे बहु. संस्था, चंद्रपूर ही संस्था शिक्षण आणि आरोग्य ह्या विषयावर काम करते. शिक्षण व आरोग्यावर आजवर अनेकांना गरजूंना मदत केली आहे. या संस्थेत तीनशेच्यावर सदस्य आहे. दरमहिन्याला १०० रुपये प्रत्येक सदस्य जमा करतात. या जमा रक्कमेतून गरजूंना मदत करण्याचे सामाजिक कार्य संस्था अविरत करीत आहे.
0 comments:
Post a Comment