चंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या पक्षि संरक्षण विभाग व पर्यावरण विभाग तर्फे पक्षि सप्ताह निमीत्त जुनोना तलाव परिसरात पक्षि निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी इको-प्रो संस्थेतर्फे अरण्यऋषी मारूती चितमपल्ली व पक्षितज्ञ डॉ सलिम अली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधुन 5 नोव्हे ते 12 नोव्हे दरम्यान पक्षि सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यानिमीत्त भद्रावती इको-प्रो शाखेतर्फे 5 नोव्हे पासुन रोज भद्रावतील तालुक्यातील वेगवेगळया तलावावर पक्षि निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. सोबतच आज इको-प्रो चंद्रपूर तर्फे जुनोना तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले.
44 प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद
आजच्या पक्षिनिरीक्षणात 44 प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहीती इको-प्रो पक्षीविभाग प्रमुख बंडु दुधे यांनी दीली. यावेळी इको-प्रो तर्फे सहभागी सदस्य तथा नागरीकांना विवीध पक्ष्याची माहीती देण्यात आली. आज आढळुन आलेल्या पक्ष्यांमध्ये वारकरी, अडई, पाणडुबी, पाणकावळा, जांभळा बगळा, गाय बगळा, उघडया चोचीचा करकोचा, काळा शेराटी, काणुक, कमळपक्षी, पाणमोर,टिटवी, तुतवार, कठेरी चिलखा, कवडी, पोपट, भारव्दाज, पटटेरी पिंगळा, धिवर, खंडया, निलपंख, पाकोळी, हळदया, कोतवाल, सांळुखी, टकाचोर, लालबुडया भांडीक, रान सातभाई, दयाळ, चिरक, पिवळा धोबी या पक्ष्यांचा समावेश होता. मात्र अदयाप स्थलांतरीत पक्षी अदयाप तलावावर आलेली नसल्याचे माहीती पक्षीमित्र बंडु दुधे यांनी दिली.
सहभागी सदस्य नागरिक
यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, पक्षि विभाग प्रमुख बंडु दुधे तर अमोल उटटलवार, संजय सब्बनवार, राजु काहीलकर, आकाश घोडमारे, सचिन धोतरे, सुधिर देव, प्रमोद मालिक, महेश घोड़मारे सोबत महीला व मुलें सहभागी झाले होते.
जुनोना तलावास प्रतीक्षा स्थलांतरित पक्ष्याची
अद्याप हवी तशी थंडी पडली नसल्याने स्थलांतरित पक्ष्याचे आगमन लांबले असल्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे तलावात मोठ्या प्रमाणात जलीय तण, वनस्पति मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्याने सुद्धा या पक्षी अधिवास धोक्यात आलेला आहे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment