Ads

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे द्या -BRSPभद्रावती शहर शाखेची मागणी

भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :
-आज दिनांक 23/11/2021रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती चा वतीने नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यामागचे कारण म्हणजे 24/11/2021 पासून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे मिळण्यात यावे या करिता कागद पत्रे मागविण्यात येत आहे, त्यामुळे लोकांना जागेचा पट्ट्या विषयी वार्ड मध्ये नगर पालिका कर्मचाऱ्यांनी येऊन जनजागृती करून वार्ड मध्ये नगर पालिका कर्मचारी यांनी शिबीर लावावं या करिता निवेदन देण्यात आले, निवेदन देते वेळी BRSP शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, शहर महासचिव प्रणय दारव्हेकर, शहर सचिव स्वप्नील कोल्हटकर, दिपक वानखेडे, अंकुश पोगे, विशाल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंद नगर न्यू सुमठणा भद्रावती येथील सांडपाण्याचा विल्हेवाट लावण्याबाबत BRSP चे मुख्य अधिकारी यांना निवेदन
रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती चा वतीने नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले, निवेदन देण्यामागचे कारण म्हणजे सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट लावण्याबाबत.
आनंद नगर न्यू सुमठणा येथील ईश्वर तेलंग, ते किशोर दारव्हेकर, यांच्या घरापर्यंत सांडपाणी वाहून जाण्यासाठी जी नाली नगरपरिषदने बनवलेली आहे त्या नाली वरती श्री देविदास पाजारे यांनी घराचे अतिक्रमण बांधकाम करून सांडपाणी वाहून जाण्यास रोचक निर्माण केल्यामुळे नाली तुंबल्या गेली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य खूप प्रचंड धोक्यात आहे.आणि सध्याच्या परिस्थितीत डेंगू चिकनगुनि
या मलेरिया यांची खूप साथ चालू आहे त्या नाली मध्ये विषारी साप सुद्धा आढळून येत आहे. त्या करिता आपल्यास नीवेदेन देण्यात येत आहे तरी वरील समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी ही विनंती. निवेदन देते वेळी BRSP शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, शहर महासचिव प्रणय दारव्हेकर, शहर सचिव स्वप्नील कोल्हटकर, दिपक वानखेडे, अंकुश पोगे, विशाल कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment