बल्लारपूर प्रतिनिधी :-शहराजवळील विसापूर गावात घरगुती वादाच्या तपासात पोलिसांनी नकली लग्न करून पैसे घेऊन पळून जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी नवविवाहितेसह चार आरोपींना अटक केली आहे.
विसापूर येथील रहिवासी ईश्वर कुळमेथे यांची मुलगी नंदिनी हिचा विवाह राजस्थान येथील समय सिंग नावाच्या व्यक्तीशी झाला आहे. नंदिनी सिंग यांचा संसार आनंदात सुरू आहे. नंदिनीचा दिर राजेंद्र सिंग याच्या लग्नाची गोष्ट सुरू होती. त्यामुळे दिवाळीच्या सणाला राजस्थानहून येत असताना नंदिनी ही तिचा दिर राजेंद्र यालाही सोबत घेऊन विसापूरला आली होती. 25 नोव्हेंबर रोजी ईश्वर कुळमेथे यांनी बँक ऑफ बडोदामधून जावई समय सिंग याने पाठवलेले पैसे काढले. दरम्यान आरोपी रामटेके उर्फ सोनू बोरकर याने ईश्वर कुळमेथे यांना पैसे काढण्याचे कारण विचारले. यावर ईश्वर कुळमेथे यांनी आपल्या मुलीच्या दिराचे लग्न करायचे आहे, त्यासाठी पैसे काढल्याचे सांगितले. त्यानंतर रामटेके उर्फ सोनू बोरकर याने कुळमेथे यांच्याकडे मोबाईल क्रमांक मागितला व लगेच फोन करून विवाहित योग्य मुलगी असल्याचे सांगितले. ही तरुणी चंद्रपूरची रहिवासी असून ती तिच्या मावशीकडे राहते. यानंतर सोनू बोरकर हा त्याचा सहकारी व्यंकटेश राधांती याच्यासोबत विसापूर येथे आला व त्याने ईश्वर कुळमेथे याला सांगितले की, ज्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्या मुलीची मावशी आजारी आहे. तिला 75 हजार रुपये द्यावे लागतील. या आधारे दोघांनी कुळमेथे यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर प्रेमलता उर्फ सीमा बर्मन हिला विसापूरला आणून राजेंद्र सिंह यांच्याशी लग्न लावले. विवाहादरम्यान किरण उर्फ ज्योत्सना सुखदेवे हिने आपला परिचय प्रेमलताची मावशी असल्याचा दिला.
लग्नानंतर काही वेळातच प्रेमलता उमरे या फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या. तेव्हा एक मोटारसायकल तिला घेऊन जाण्यासाठी तयार उभी होती. मात्र प्रेमलता पळत असल्याचे पाहून राजेंद्र सिंह यांनी आरडा ओरड केली आणि त्यामुळे आरोपी पकडले गेले. फिर्यादी ईश्वर कुळमेथे यांच्या फिर्यादीवरून बल्लारपूर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अटकेतील चार आरोपींमध्ये सोनू बोरकर, व्यंकटेश रंधती, नवविवाहित प्रेमलता उमरे उर्फ सीमा बर्मन आणि तिची मावशी किरण उर्फ ज्योत्स्ना सुखदेव यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय प्राची राजूरकर करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, एसडीपीओ राजा पवार, ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्राची राजूरकर, एपीआय विकास गायकवाड, गणेश तोटेवार, ज्योती अकतोटावार, विकास खरात यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment