घुग्घुस : सत्यशोधक समाजाचे निर्माते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक,बालविवाहाचे विरोधक, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते ज्योतिराव गोविंदराव फुले यांची 28 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी निमित्त काँग्रेस कार्यालयात ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस मालार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
ज्योतिबांना मानवंदना देण्यात आले.
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण जीवन दिन दुबळ्या वंचित शोषितांच्या जीवनमान सुधारणे करिता खर्ची घातले एकोणविसाव्या शतकात मुलींना शिक्षण घेण्याची सक्ती असतांनी त्यांनी आपल्या धर्मपत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देऊन देशातील पहिली कन्या शाळा पुण्यात शुरू केली.
व समाजाचा अतोनात छळ सहन करून सावित्रीबाई ह्या शिक्षिका बनल्या त्या केवळ ज्योतीबा मुळेच, जाती - जातीतील विभाजन हे ज्योतिबांना मान्य नव्हते त्यांनी दलित, शेतकरी,विधवा पुनर्विवाह करणे, बालविवाह थांबविणे असे अनेक समाज सुधारक कार्य केले.
ज्योतीबा फुलेंनी 1869 साली रायगडावर भग्नावस्थेत असलेली शिवसमाधी शोधून काढली व 1870 साली देशात प्रथम शिवजयंती साजरी केली.
ज्योतिबांनीच आधुनिक युगाचा शिव पोवाडा लिहिला अश्या या "महात्मा"स विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, विशाल मादर, रोशन दंतालवार,देव भंडारी, बालकिशन कुळसंगे,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे,सुनील पाटील, सुरेश टेम्बुरने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment