Ads

पोंभुर्णा येथे भव्य मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.


Grand Cataract Examination and Surgery Camp at Pombhurna *
पोंभुर्णा, दुर्योधन घोंगडे :-
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे मित्रपरिवार पोंभुर्णा,लाॅयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर,महाविर इंटरनॅशनल सेंटर चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी व शश्रक्रिया शिबिर पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर या ठिकाणी संपन्न झाले.

भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने रुग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा या मार्गाचा अवलंब करून गोरगरीब सामान्य नागरिकां करिता डोळ्यांची मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया व्हावी म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही जन्मदिवसाची भेट म्हणून तालुक्यात पोंभुर्णा येथे राजराजेश्वर सभागृहाच्या प्रांगणात लाॅयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर, महाविर इंटरनॅशनल सेंटर , यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी रित्या पार पडला.

यावेळी भाजपा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, जेष्ठ नेता भाजपा अजीत मंगळगीरीवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय मस्के ,तालुका सचिव युवा मोर्चा अमोल पाल, शहराध्यक्ष रुषि कोटरंगे, माजी नगराध्यक्ष श्वेता वनकर, माजी उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी, माधुरी मोरे, नंदकिशोर तुम्मुलवार, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा मोहन चलाख, विनोद कान्नमपलीवार,नेरु मोरे, आशिष देशट्टीवार, महेश रणदिवे,संजय जवादे, अमोल मोरे, श्रीकांत वडस्कर,ओमदेव पाल,बबन गोरंतवार,सुरज बुरांडे,प्रज्वल कोतपल्लीवार, सुरेंद्र वडस्कर, प्रफुल्ल रोहणकर, दर्शन गोरंटिवार संजय कोडापे, प्रेम भंडारी, दिलीप भंडारी,हरीष मुठा,पुणम तिवारी, इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment