चंद्रपूर : जिल्ह्याचा प्रदूषणात पहिल्या पाच क्रमांकात नंबर लागतो. हि बाब अत्यंत खेदाची असून यापासून बचाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येणाची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रत्येक ठिकाणातील खुली मैदाने हि पर्यावरणाचे संवर्धन करणारी केंद्र ठरावी, त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. त्यांनी वडगाव प्रभागातील दीक्षित - खोकले लेआऊट येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका सुनीता लोढीया, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, जनार्दन धगडी, जसवंत सिंग, प्रा. दुर्गे, श्रीनिवास बोरावार, दुपारे, स्वाती त्रिवेदी, धोटकरताई, हरिचंद्र ठावरी, यश दत्तात्रय यांची उपस्थिती होती.
यावेळी नगरसेविका सुनीता लोढीया म्हणाल्या कि, शहरातील अनेक ठिकाणी ओपन स्पेस सोडण्यात आले आहे. मात्र या ओपन स्पेसचा मनपाने विकास केला नाही. त्यामुळे काही ओपन स्पेसवर नागरिकांनी अतिक्रमण करून ती बळकाविली तर काही ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. ओपन स्पेसमध्ये फुलांची झाडे दिसण्याऐवजी गवत व झुडपे वाढली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यासोबतच ओपन स्पेसमध्ये प्राण्यांच्या हैदोस राहत असल्याने सभोवतालचे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे त्यांनी केली.
यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी हि मागणी मान्य करीत दीक्षित - खोकले लेआऊट येथील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येत्या काळात शहरातील खुल्या जागेचा विकास करून प्रत्येक ठिकाण पर्यावरण संवर्धनाचे केंद्र बनतील असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment