शहरात दडून बसलेल्या दुचाकीचोरास राजुरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राजुरा Rajura :- राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत मागील 2 महिन्यापासून दुचाकी वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती, 2 महिन्याच्या कालावधीत शहरातील 3 दुचाकी चोरीचे गुन्हे राजुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बहादुरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शोध पथकाने खबरी नेटवर्क ऍक्टिव्ह करीत आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध सुरू असताना राजुरा शहरातील सोमनाथ पुरा भागात राहणाऱ्या 35 वर्षीय शेख अब्दुल शेख गफ्फार याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर दुचाकी चोरी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीला अटक करीत चोरीला गेलेल्या 3 दुचाकी आरोपी कडून ताब्यात घेण्यात आल्या. सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सपोनि दरेकर, खुशाल टेकाम, पो. हवा. रवींद्र नक्कवर, पो. हवा. किशोर तुमराम, पो. शी. संदीप बुरडकर, पो. शी. रामराव बिंगेवड, पोशी योगेश पिदूरकर यांनी पार पाडली.
0 comments:
Post a Comment