Ads

शहरात लावण्यात आलेल्या कुत्रीम फुफ्फुस बोर्ड ठिकाणी चांदा पब्लीक स्कुलच्या विदयार्थ्याची भेट

चंद्रपूरः
शहरात इको-प्रो व वातावरण फांउडेशनच्या वतीने ‘कुत्रीम फुफ्फुस’ लावण्यात आले असुन आज या ठिकाणी चांदा पब्लीक स्कुलच्या विदयार्थ्यानी भेट देउन सदर उपक्रमाबाबत, शहरातील प्रदुषण आणि हवेचा दर्जा, हवा गुणवत्ता निर्देशांक याबाबत माहीती जाणुन घेत हातात फलक घेउन शुध्द हवेची मागणी केली.

चंद्रपुर शहर हे सर्वाधिक प्रदुषित शहर असुन विवीध प्रकारच्या प्रदुषणाची तिव्रता दिवसागणीक वाढत असल्याचे दिसुन येते. वाढत्या प्रदुषणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणुन इको-प्रो कडुन विवीध उपक्रमाचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणुन मुंबईच्या वातावरण फांउडेशन च्या मदतीने व चंद्रपूर क्लिन एअर अॅक्शन गृपच्या सहभागाने सदर लंग बोर्ड कुत्रीम फुफ्फुस मुल रोडवर रामनगर पोलीस स्टेशन लगतच्या ट्रैफिक सिंग्नल जवळ लावण्यात आले आहे. 17 नोव्हे पासुन लावण्यात आलेले पांढरे शुभ्र कुत्रीम फुफ्फुसे मात्र सहा दिवसात बरेच प्रमाणात काळे पडल्याचे दिसुन येत आहे. या उपक्रमाबाबत जागरूकतेचा भाग म्हणुन शहरातील हवेचा दर्जा, हवा गुणवत्ता निर्देंशांक काय असतो त्याविषयी विदयार्थ्याना माहीती व्हावी म्हणुन आज चांदा पब्लीक स्कुलचे विदयार्थ्यानी भेट देत याविषयी अधिक जाणुन घेतले. यावेळी आलेल्या विदयार्थ्याना इको-प्रोचे बंडु धोतरे यांनी सदर उपक्रम व शहरातील प्रदुषणाविषयी व आपलीं जवाबदारी विषयी माहीती दिली.
या भेटीदरम्यान विदयार्थ्याना हवेची गुणवत्ता, त्याची मानके, हवेचा किती निर्देशांक असले की हवा चांगली किंवा आरोग्यासाठी हानीकारक कसे ठरतात, हवेची गुणवत्ता तपासणे यंत्र याविषयी माहीती देताना सदर ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक सतत सरासरी 200 असल्याने ते ‘अतिशय अस्वस्थ’ म्हणजे ‘वेरी अनहेल्थी’ असल्याचे कळते. यावेळी अनेक विदयार्थ्यानी आपली प्रतीक्रीया व्यक्त केल्या. यावेळी अंशिका भटटाचार्य हीने सदर उपक्रमामुळे आम्हाला कळले की शहरातील प्रदुषणाची तिव्रता कीती आहे, ही कुत्रीम फुफुस जसी 5-6 दिवसातच काळी पडली तशी अनेक वर्षापासुन आपल्या फुफुसांची काय अवस्था असेल ते फक्त आपरेशनच्या वेळेस डॉक्टरांना दिसुन येत आहे, अशी प्रतीक्रीया व्यक्त केली. याशिवाय दिव्या मिश्रा, श्रेया बेले, अदिती सुरपाम, रमनप्रीतसिंग जसपाल, निकुंज कोमटी, अनुज देशमुख या विदयार्थ्यानी प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

यावेळी विदयार्थ्यानाी ‘शुध्द हवा, आमचा हक्क, से टु स्टॉप एअर पोल्युशन, 'प्रदुषण कमी, जिवणाची हमी', 'वृक्ष वाचवा, शुध्द हवेसाठी', 'रक्षण करूया पर्यावरणाचे-संपुर्ण मानवजातीसाठी' अशी लिहलेली हातात फलक घेउन होते. शुध्द हवा, आमचा हक्क' अशी मागणी यावेळी सर्व विदयार्थ्यानी एकत्रीत येत केली. यावेळी चांदा पब्लीक स्कुल चे शिक्षक फहिम शेख, अर्चना जाधव, रूहीना सयद तर इको-प्रो पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन रामटेके, कपील चौधरी तर चंद्रपूर चे वातावरणमित्र सचिन धोतरे, महेश्वर खेतान उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment