भद्रावती : विवेकानंद महाविद्यालय भद्रावती द्वारा आयोजित 'सस्नेटेबल एशीयाज प्रॉब्लेमस अँड प्रॉस्पेक्टस' या विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स दिनांक 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, 2021 ला श्री.अरविंद आश्रम पूड्डेचेरी येथे विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेन्ट), वरोरा चे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात संपन्न होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तुत इंटरनॅशनल कॉन्फरन्स पार पडणार आहे. सदर कॉन्फरन्सचे प्रमुख वक्ते टोईन व्हॅनमेगन फ्रान्स युलिय शामी ईवा, कराजीन नॅशनल युनिव्हर्सिटी युक्रेन, जॉन पॅट्रिक शा आयर्लंड व उदया मौनी बोपन्ना, युनिव्हर्सिटी तूम हसीन आॅन मलेशिया (UTHM) उपस्थित राहणार आहेत. या कॉन्फरन्स करिता देश-विदेशातून 300 प्राध्यापक ऑफलाइन व ऑनलाइन सहभागी होणार असून त्यांचे संशोधन पेपर सादर करणार आहेत असे आयक्यूएसी सेलचे समन्वयक प्रा.मोहित सावे यांनी कळविले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment