Ads

ग्रामोदय संघ भद्रावतीचे टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर व संशोधन केंद्राला तात्विक मान्यता - खासदार बाळू धानोरकर*

चंद्रपूर : ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग च्या स्फूर्ती योजनेअंतर्गत टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर चा १.८१ करोडचा प्रकल्प मंजूरी असून संबंधित मंत्रालयातून निधी अप्राप्त असल्याने हा मंजूर प्राप्त प्रकल्प रखडला होता. या प्रकल्पाचा निधी त्वरित मिळावा तसेच प्रशिक्षण व संशोधन उत्कृष्टता केंद्राला ग्रामोद्योग संघात त्वरित मान्यता द्यावी म्हणून चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी आज दिल्ली येथे सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ग्रामोदय संघ भद्रावतीचे श्री. विजय श्रीवास्तव व जितेंद्रकुमार चौधरी हे देखील उपस्थिती होते.

सद्यस्थितीत ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग यांचे सहाय्याने प्रादेशिक कुंभारकाम प्रशिक्षण केंद्रात मातीकाम उद्योगाच्या विविध अभ्यासक्रमाचे नियमित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहेत. उच्च तापमानाची भांडी (सिरॅमिक) मध्ये विविध उत्पादने, फ्लाय अ‍ॅशची उत्पादने जसे विटा, पेव्हर ब्लॉक, दारे- खिडक्यांच्या फ्रेम इत्यादी उद्योग सुरु आहेत.

भद्रावती शहरात ग्रामोदय संघात हा प्रलंबित प्रकल्प आल्यास येथील बेरोजगारांचा हाताला काम मिळणार आहे. या भागातील युवकांना काम मिळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात देखील हा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने आज त्यांनी लघु सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी देखील यावर सकारात्मक प्रतिसाद देत तात्विक मान्यता देत या दोन्ही प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment