Ads

साहित्यगंध पुरस्काराने परमानंद तिराणिक सन्मानित

Parmanand Tiranik honored with Sahityagandh Award
भद्रावती( तालुका प्रतिनिधी ):-सामाजिक तथा कलाक्षेत्रातील सेवेसह उल्लेखनीय " एक लाख पोस्टकार्डावर " संविधानाची उद्देशिका" स्वहस्ताक्षरात लिहून जनजागृती करत असल्याबद्दल मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था, नागपूर या सामाजिक संस्थेने परमानंद तिराणिक, कलाशिक्षक यांना डाँ. बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृहात "साहित्यगंध पुरस्काराने" मा.प्रा. प्रशांत मांजरखेडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
परमानंद तिराणिक अनेक वर्षांपासून विविध ताज्या घडामोडींवर आपल्या कलेच्या माध्यमातून "कचऱ्यातून कलानिर्मिती" हा प्रोजेक्ट हाती घेतला असून आदिवासी कला संवर्धन समितीच्या अंतर्गत टाकवू वस्तूपासून कलेच्या दृष्टीकोणातून निसर्गातच सोंदर्य कसे निर्माण करता येऊ शकते याचा ते प्रचार आणि प्रसार करून या माध्यमातून जनजागृती करीत आहेत..
यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नागपूर येथे एका शानदार सोहळ्यात, पुष्पगुच्छ तथा साहित्यगंध दिवाळी अंक , सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्थाचे राज्य अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले होते. यावेळी प्रमुख पाहूने म्हणून सुधाकर भूरके, 'भेटी लागे जिवा' या मराठी चित्रपटाच्या निर्माती प्राजक्ता खांडेकर , शिवाजी नामपले, आदिवासी रणरागीणीच्या प्रमुख रजनी मेश्राम , अल्का पचारे, नागेश्वर गेडाम इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment