चंद्रपुर:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय महेबूब भाई शेख यांच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे चंद्रपूर शहरातील ३६ गरजवंतांना थंडीच्या या काळात ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तसेच कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाच्या सर्व सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या पदापर्यंत पोहोचल्यानंतर ही कुठल्याही प्रकारचा अहंकार नसून राज्यातील कानाकोपऱ्यातील युवकांना आपलं व हवहवस वाटणार युवा नेतृत्व श्री. मेहबूब भाई शेख आहे.
ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नव्हती, जेव्हा अनेक दिग्गज पक्षाला व आदरणीय पवार साहेबांना सोडून जात होते त्यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा कोणी घ्यायला तयार नव्हते त्यावेळी या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने हे काटेरी मुकुट स्वीकारले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मा. मेहबूब शेख यांनी संपूर्ण राज्यातील तालुक्यासह जिल्हे पिंजून काढले. अनेक ठिकाणी पदाधिकारी नव्हते. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली सारख्या जिल्ह्यात त्या ठिकाणी स्वतः जाऊन तेथील युवकांच्या अडचणी समजून घेऊन नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर जबाबदारी दिली. तालुका स्तरावरून नव्याने संघटना बांधणी सुरू केली. अनेक जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली व सर्वांना विश्वासात घेऊन राज्यात इतर कोणत्याही पक्षाची युवक संघटना जेवढी बळकट नव्हती तेवढी पक्षाची सत्ता नसताना देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटना ही सर्वात मोठी युवक संघटना म्हणून मेहबूब भाई ने पुढे नावारूपास आणली.
आमच्यासारख्या पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांना सुद्धा कधी दुय्यम वागणूक न देता सर्व कार्यक्रमात, प्रक्रियेत, बैठकीत जेवढा मान सन्मान मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आला तेवढाच मान सन्मान चंद्रपूर व गडचिरोली च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना देखील आदरणीय मेहबूब भाई ने दिला.
मा. मेहबूब भाई च्या नेतृत्वात काम करत असताना कधीच प्रदेशाध्यक्ष व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पदाची व श्रेष्ठत्वाची दरी राहनार नाही याची पुरेपूर काळजी महेबुब भाईंनी घेतली.
लहानातल्या लहान कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतले, समजून घेतले व वेळप्रसंगी समजावून सुद्धा सांगितले. परंतु कधीच रागावून व दुय्यमपणाची वागणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या युवा नेतृत्वाने दिली नाही.
जेवढे शांत, जेवढे मृदुभाषी वेळप्रसंगी तेवढेच आक्रमक व विरोधकांवर तुटून पडणारे असे व्यक्तिमत्व आहे याचा देखील सर्वांनी अनुभव घेतला.
या नेतृत्वाने पक्ष सत्तेत नसताना रस्त्यावर उतरून अनेक आक्रमक आंदोलन केले. आदरणीय पवार साहेबांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीच्या विरोधात स्वतः चोख पोलिस बंदोबस्त असताना देखील ई.डी. कार्यालयासमोर केलेले आक्रमक आंदोलन असो किंवा तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर केलेले धडक आंदोलन असो. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री मा. प्रकाश मेहता यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक पने केलेल्या आंदोलनाची दखल घेत तर तत्कालीन भाजपा सरकारने श्री. प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतला होता. या आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी अनुभव सुध्दा घेतला आहे.
अशा या सर्वसंपन्न युवा नेतृत्वास दीर्घायुष्य लाभो. राजकारणात असल्यानंतरही समाजकारणाची भरीव जोड असलेल्या या युवा नेतृत्वास वाढदिवसाच्या निमित्ताने आज गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष श्री राजीवजी कक्कड, विधानसभा अध्यक्ष श्री सुनीलजी काळे, जिल्हा सरचिटणीस अभिनवजी देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष रोशनजी फुलझेले, ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंनाडे, पंचायत समिती सदस्य श्री पंकज ढेंगारे, ग्रामपंचायत सदस्य अंकितजी ढेंगारे, उपाध्यक्ष आकाशजी निरटवार, सौरभजी घोरपडे, जिल्हा सरचिटणीस संदीपजी बिसेन, केतनजी जोरगेवार, कोमिलजी मडावी विपिलजी लभाने, संजय रामटेके, हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment