चंद्रपुर :-चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मा.सा. कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल येथे भेट देऊन खेळाडू व नागरिकांशी 'ऑन दी स्पाॅट' थेट संवाद साधला. जिल्हा स्टेडियमवर फिरायला येणारे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे वॉकिंग ट्रॅक करिता तातडीने 25 लक्ष रुपये निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्हा स्टेडियम मित्र परिवार,ज्येष्ठ हॉलीबॉल संघ इत्यादी सामाजिक संघटनेंनी वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या माध्यमातून वाॅकिंग ट्रॅक ची मागणी लावून धरली होती.
यानंतर आमदार जोरगेवार यांनी बास्केट बॉल ग्राउंड,स्केटिंग रिंग तसेच क्रीडा संकुलातील इतर सुविधा व कामांची पाहणी केली. क्रीडा संकुलातील विकास कामांना गती देण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे सुद्धा आश्वासन त्यांनी दिले. क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध संघटनांची समिती स्थापन करून विधानसभा क्षेत्रातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या हेतूने दरवर्षी आमदार निधीतून पाच लक्ष रुपये निधी देण्याची घोषणा सुद्धा आमदार जोरगेवार यांनी केली.
नगरसेवक पप्पू देशमुख यांच्यातर्फे या थेट भेट व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनविकास सेनेचे मनिषा बोबडे,इमदाद शेख, अक्षय येरगुडे,आकाश लोडे,गितेश शेंडे, जिल्हा स्टेडीयम मित्र परिवाराचे दिलिप झाडे,राजेश पोटे,चंद्रकांत अग्रवाल,ओमप्रकाश यंगलवार,भैय्याजी मुळे,दिपक पद्मगीरीवार,अजय मार्कंडेवार जेष्ठ व्हाॅलीबाॅल संघाचे प्रदीप जानवे, दिपक जेऊरकर, श्याम थेरे, स्वामी साहेब, कुंभारे साहेब, कमलाकर जोगी,हेमंत घिवे,प्रवीण गुज्जनवार, डॉ. किशोर जेणेकर, अमित दिकोंडवार, संदीप ढोबळें, संतोष बोरीकर, सिध्दार्थ वाघमारे, कुक्कुजी, सचिन राजूरकर,चंद्रपुर डिस्ट्रिक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे हेमंत घिवे, निलेश कांबळे,सुरेंद्र चंदेल,चंद्रपूर जिल्हा स्केटिंग ऍड हॉक कमिटी विनोद निखाडे ,प्रवीण चवरे, आतिष धुर्वे,बास्केट बॉल संघाचे सचिन भिलकर,चेतन गज्जलवार,पंकज गेंडे,धनराज धवस,हर्षल वनसिंग, शुभम बोंडे,मनीषा मोरे, बॉक्सिंग संघटनेच्या राजश्री चौधरी, अस्मिता अडकिने, स्मिता जाधव, जानवी गुरफुडे तसेच पतंजली योग स्टेडियम ग्रुप इत्यादी संघटनेचे खेळाडू व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment