Ads

भांदक रेल्वे परिसरात १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख:-
 भांदक रेल्वे स्टेशन परिसरात आज पहाटे एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ, विद्युत वाहिनी पोल क्रमांक ८५२ B/३४ AI येथे घडली.
18-year-old youth commits suicide by hanging himself in Bhandak railway area
सध्या वर्धा–बल्लारशाह रेल्वे लाईन व सायडिंगचे काम सुरू असल्याने मध्यप्रदेश व इतर राज्यांतील अनेक मजूर भांदक परिसरात हंगामी रोजगारासाठी आले असून ते रेल्वे परिसरात कुटुंबासह झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत.
मृत युवकाचे नाव दुर्गेश प्रसाद मसराम (वय १८) असे असून तो मूळचा ग्राम कोको, तहसील बिछिया, जिल्हा मंडला (मध्यप्रदेश) येथील रहिवासी होता. तो आपल्या आई-वडिलांसोबत येथे मजुरीचे काम करीत होता.
आज पहाटे दुर्गेश घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता तो रेल्वे लाईनजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ही घटना मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) करत आहे.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे हलविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment