जावेद शेख प्रतिनिधी :-
पोलिस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकाने एमआयडीसी चिंचाळा परिसरातील इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून चोरीस गेलेले बेंडिंग मशीनचे रोलिंग हँडल अवघ्या 48 तासांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. crime
दि. 11/02/2026 रोजी फिर्यादी राजेश वारलुजी बेले (वय 43, रा. जटपुरा वार्ड, चंद्रपूर) यांनी तक्रार दिली की त्यांच्या एमआयडीसी चिंचाळा येथील कार्तिक इंजिनिअरिंग वर्कशॉपमधील बेंडिंग मशीनचे सुमारे 80,000 रुपयांचे रोलिंग हँडल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. यावरून पोस्टे पडोली येथे अप.क्र. 131/2026, कलम 303(2), 3(5) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुप्त माहितीच्या आधारे सप्रेम लेमचंद दुर्गे (वय 19, रा. एमआयडीसी हनुमान नगर, चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन विधिसंघर्ष बालकांच्या मदतीने दि. 11/02/2026 रोजी पहाटे 2:45 वाजता चोरी केल्याची कबुली दिली. चोरीसाठी वापरण्यात आलेली टीव्हीएस कंपनीची एनटॉर्क (MH-34-CK-4195) दुचाकीही जप्त करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून 80,000 रुपयांचे रोलिंग हँडल व 80,000 रुपयांची दुचाकी असा एकूण 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई डीबी इंचार्ज विनोद वानकर व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
0 comments:
Post a Comment