जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात भद्रावती पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तब्बल ८ महागडे मोबाईल फोन शोधून काढले असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते आज मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपले हरवलेले फोन परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
Bhadravati Police's great achievement! 8 lost mobile phones found and handed over to their original owners
तांत्रिक विश्लेषण अन् CEIR पोर्टलचा वापर, गेल्या काही दिवसांत भद्रावती तालुका भागातून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी केंद्र सरकारच्या 'संचार साथी' (CEIR Portal) प्रणालीचा आणि तांत्रिक विश्लेषणाचा (CDR / IMEI Tracing) प्रभावी वापर केला. मोबाईलचे अचूक लोकेशन मिळवत पोलिसांनी विविध ठिकाणांहून हे ८ मोबाईल फोन हस्तगत केले.
हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलचा तपशील:
एकूण मोबाईल: ८ फोन अंदाजे किंमत रु.1,20,000
कंपन्या:
नागरिकांकडून पोलिसांचे आभार
मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळेल याची आशा बहुतेकांनी सोडली होती. मात्र, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या अथक प्रयत्नांमुळे फोन परत मिळाल्याने सर्व ८ मोबाईल धारकांनी पोलीस प्रशासनाचे आणि सायबर टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
"नागरिकांचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास त्यांनी घाबरून न जाता तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच www.sancharsaathi.gov.in या पोर्टलवर जाऊन मोबाईल ब्लॉक करावा, जेणेकरून त्याचा गैरवापर रोखता येईल आणि पोलिसांना शोध घेणे सोपे जाईल ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानि यांचे मार्गदर्शनात एस डी. पी. ओ. सचिन खेत्रे,. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी नापोअ भारत पुसांडे, सायबर मपओ पल्लवी किनाके पो . स्टे.भद्रावती उत्तमरीत्या कामगिरी बजावली
0 comments:
Post a Comment