Ads

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव नियत क्षेत्रामध्ये बिबट्याचा मृत्यू

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही. -  सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २३४/५७६ आरएफमध्ये गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, या मादी बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्यांच्या झुंजीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Leopard dies in Nawargaon designated area under Sindewahi forest area
या बाबत माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावर अंदाजे २ वर्षे वयाच्या बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती भ्रमणध्वनीव्दारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर घटनास्थळावर ब्रह्मपुरी वनविभागचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर., सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) अरविंद जे., चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकार, तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे शितलकुमार भांडारकर, स्वॉब नेचर फाऊंडेशनचे जिवेश सयाम, बायोलॉजीस्ट राकेश अहुजा आदी उपस्थित झाले. त्यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment