Ads

नागलोण फाट्यावर पहाटेच महसूलचा सर्जिकल स्ट्राइक!

जावेद शेख | प्रतिनिधी भद्रावती :
गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. ही कारवाई मंगळवार, दिनांक 12 रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजता नागलोण फाटा परिसरात करण्यात आली.Revenue Department’s Early Morning Surgical Strike at Naglon Phata!
कुसना येथे जात असलेल्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती भरलेली असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार एमएच 29 बीडी 8482 क्रमांकाच्या ट्रॅक्टरची तपासणी करण्यात आली असता अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. संबंधित वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
सदर ट्रॅक्टर हा मिलिंद नथ्थुजी ताजने (रा. कुचना) यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी खोब्रागडे यांनी केली. तसेच पुढील कार्यवाहीसाठी ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक व खुशाल मस्के यांना पाचारण करण्यात आले.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment