जावेद शेख भद्रावती प्रतिनिधि:- दिनांक 14/02/2026 रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ नियतक्षेत्रामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती वनविभागास प्राप्त झाली.
Early Morning Crackdown by Forest Department; Tractor Seized for Illegal Sand Transportation in Masal Reserved Area!
मा. श्री. राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर व मा. विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. के. डब्ल्यू. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी राखीव वन परिसरात छापा टाकला.
कारवाईदरम्यान श्री. भारत वसंतराव बोडेकर, रा. मांगली (१), ता. भद्रावती यांच्या मालकीचा महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर (क्रमांक MH-29-BP-0418, रंग लाल) व क्रमांक नसलेली ट्रॅक्टर ट्रॉली (रंग लाल) ही शासकीय राखीव वन कक्ष क्रमांक 219, नियतक्षेत्र मासळ येथील नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करताना आढळून आली.
वाहनचालकास रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भातील परवाना व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली असून वाहन मालकाविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री. ए. बी. शेळकी (क्षेत्र सहाय्यक, मासळ), कु. एस. आर. कुळमेथे (वनरक्षक, मासळ – अति.), श्री. एस. एस. पारवे (वनरक्षक, भद्रावती), तसेच श्री. अनिल शेंद्रे, श्री. किशोर मडावी, श्री. पवन मांढरे व श्री. नितिन राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी केली.
अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाची शोधमोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
0 comments:
Post a Comment