Ads

Chandrapur मध्ये ‘रेकॉर्डवरील शुटर’ जेरबंद; ३ घरफोड्या उघड, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!'

चंद्रपूर, दि. १४ फेब्रुवारी २०२६ :  पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार शहरात प्रोव्हिजन, जुगार रेड, मोटारसायकल चोरी व घरफोडी गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली.crime
'Record shooter' arrested in Chandrapur; 3 house burglaries exposed, valuables worth Rs 21 lakh seized! पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोस्टे रामनगर हद्दीतील इंदिरानगर परिसरात घरफोडी करणारा आरोपी मो. सरफरोज उर्फ “शुटर” सगीर शहा (वय २५, रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत त्याने व त्याचा साथीदार सद्दाम मुस्ताक शेख (वय ३०, रा. बँक ऑफ इंडिया मागे, घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर) यांनी पोस्टे रामनगर हद्दीतील इंदिरानगर, कृष्णानगर व शामनगर परिसरात एकूण ३ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एकूण २१,१९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीनही घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना पोस्टे रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन (चंद्रपूर), मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनील गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
शहरात वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई धडाकेबाज ठरली असून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment