चंद्रपूर : गावापासून ते शहरापर्यंत बदल घडवायचा असेल तर काँग्रेसला एकहाती सत्ता द्या, विकास करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. येत्या काळात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत कोरपना आणि जिवती येथे काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते कोरपना, जिवती येथील पदाधिकारी कार्यकर्ता, मेळाव्यात बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष धोटे, नामदेव किन्नाके, विजय बावणे, भाऊराव पाटील, काटेकार, उत्तमराव पेचे, श्याम रणदिवे, भाऊजी चव्हाण, सीताराम कोडापे, वहाफ भाऊ, रसुल पटेल, भारत चन्ने, रहेमत भाई, मनोहर चन्ने, अनिल गोंडे, निसार शेख, प्रशांत लोंढे, गणेश बोंडे, गणपत आडे, सुग्रीव गोतावडे, अष्पक शेख, रसीद अली, शामरावजी गेडाम, सचिन थोरात, जब्बार भाई, पुष्पाताई सोयाम, डॉ. अंकुश गोतावडे, कैलास राठोड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रती आत्मीयता निर्माण करावी, तसेच निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
याप्रसंगी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, दोन वर्षात मोठ्या प्रमाणात या भागात निधी खेचून आणण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. कोरपना नगरपंचायतमध्ये अग्निशमन विभाग देखील आणण्याचं मोठं काम या काळात झालेलं आहे. पुढे देखील या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध राहू. त्याकरिता जनतेने काँग्रेसचा हातात सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले.
0 comments:
Post a Comment