Ads

चरुर(धा) येथे शिलाई मशिन प्रशिक्षण उद्घाटन

Inauguration of sewing machine training at Charur (Dha)
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत चरुर(धा) येथे ९० दिवसीय शिलाई तसेच कटाई प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी उपसरपंच भारती उरकांडे यावेळी मागदर्शन करतांना विठ्ठलजी हनवते म्हणाले स्पर्धेच्या युगात स्वयंरोजगाराची फार मोठी गरज आहे.त्यामुळे तरुणींनी गृहउद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.उद्घघाटणिय मनोगत व्यक्त करतांना ग्रामपंचायत सदस्य बंडुजी निखाते म्हणाले ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपुर्त तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण महिलांकरिता मोफत शिवन कला प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.यावेळी प्रतिभा दोहतरे,आषा नन्नावरे,महाले सर, अमोल दडमल,शिलाई मशीन शिक्षिका लता नन्नावरे तसेच गावतिल प्रशिक्षणार्थी महिला वर्ग उपस्थित होते.प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा चे अध्यक्ष आशिष सुरेश हनवते व संचालन नंदकिशोर जांभुळे तर आभार नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर चे अध्यक्ष महेश केदार यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment