चंद्रपुर :-चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत महापौरपद पटकावले. त्यांनी एकूण ३२ मते मिळवली, तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते मिळाली.
BJP flag hoisted in Chandrapur! Sangeeta Khandekar becomes mayor by one vote
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अलिप्त राहिले, तर एमआयएमचा एक सदस्य तटस्थ राहिल्यामुळे निकाल अत्यंत रंगतदार ठरला. एका मताच्या फरकामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती.
भाजपला या निवडणुकीत ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती आणि अखेर त्याच समीकरणामुळे भाजपला महापौरपदावर गवसणी घालता आली. काँग्रेस सत्ता स्थापनेपासून अवघ्या एका पावलावर असतानाच भाजपने निर्णायक डाव टाकत महापौरपद आपल्या ताब्यात घेतले.
महापौर निवडीनंतर महापालिका परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके, घोषणाबाजी आणि अभिनंदनाचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
चंद्रपूरच्या राजकारणात या निकालामुळे नव्या समीकरणांची नांदी झाली असून आगामी काळात महापालिकेतील सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 comments:
Post a Comment