Ads

भद्रावती येथे पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत कार्यशाळा

जावेद शेख प्रतिनिधि भद्रावती :-
कृषी विभाग, पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने पंचायत समिती सभागृहात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत व बांबुलागवड कार्यशाळा घेण्यात आली.Workshop on precautions to be taken while spraying pesticides on crops at Bhadravati
कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समितीचे सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार यांनी करुन अध्यक्षस्थानी होते.प्रमुख अतिथी कृषी अधिकारी महेंद्र डाखरे,मंडळ कृषी अधिकारी विजय कवाळे, बांबुलागवड समन्वयक नितीश पटकोटवार, वि.अ.कृषी प्रमोद ढोरे,सुहास पाटेवार होते.कार्यशाळा गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.यावेळी वंसतराव नाईक यांच्या प्रतिमेस द्विपप्रजल्वन मालार्पण करण्यात आले.यावेळी जिल्ह्य परिषद स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा योजनेअंतर्गत सिंचन विहीर, विहीरदुरुस्ती,इनवेल बोर मंजुर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रमुख अतिथीच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, विजय कवाडे व निखील पटकोटवार यांनी अनुक्रमे पसच्या कृषी विभागाच्या विविध योजना,पसच्या वतीने व शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत,बांबुलागवडीसाठी अटल बांबु समृद्ध योजना,राष्ट्रीय बांबु अभियान याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी महेंद्र डाखरे,संचालन विअ कृषी प्रमोद ढोरे,आभार सुभाष पाटेवार यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment