Ads

जिबगांव येथील प्राथमीक आरोग्य केंद्राची ईमारत उदघाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात ..

The building of the primary health center at Jibgaon is waiting for the inauguration
सावली प्रतिनिधी :- जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तीन कोटि सेचाळीस लाख रुपये खर्च करुण सुसस्ज बांधकाम बाधण्यात आले ईमारत मात्र ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या नवीन इमारती बाधकाम करण्यासाठी राकेश गोलेपेलीवार यांनी अनेक पत्र केले असताना ३कोठी४६लाख रुपये निधी मंजुर होत प्राथमिक आरोग्य केंद्राचे नविन इमारतीचे बाधकाम पुर्ण झाले मात्र ती ईमारत धुळखात पडली आहे.

अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा खोलीत स्थलांतर करण्यात आले मात्र अगंनवाडी ईमारत पाऊसात गळत असल्यामुळे जिबगाव येथील उपकेंद्र येथे दोन तीन वर्षापासुन स्थालानंतर करण्यात आले. मात्र त्या ठिकानी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहे. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांनी त्यावेळचे तत्कालीन आमदार प्रा. अतुल देशकर यांना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले. प्रा.अतुल भाऊ देशकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते. पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे माजी अर्थमंत्री व माजी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार चंद्रपुर हे मंत्री असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांनी वांरवार पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून देण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते मंडळी व अधिकारी यांनी वेळोनवेळी भेट देत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीची पाहणी करीत असतात पन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे लोकार्पण सोहळा केव्हापार पडणार याचे कडे कुणाचे लक्ष वेदत नसल्यामुळे मात्र जिबगांव परिसरातील जनता त्रस्त आहे. तर दुसरी कडे प्राथमिक आरोग्य केंद्र धुकखात पडली असुन सर्वाचे विसर पडले आहेत याकडे लक्ष कोन देणार व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडुन उत्तुम आरोग्य सेवा मीळणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा ग्रामपंचायत सदस्य ,व माजी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी मा. उद्ववजी ठाकरे मुख्खमंत्री मा. राजेश टोपे आरोग्य मंत्री म रा, व जिल्हाचे पालकमंत्री तथा सावली- ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेटीवार,यांना सुध्दा पत्र पाठविलेले आहेत तर चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जि प अध्यक्ष चंद्रपुर संध्याताई गुरुनुले, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प चंद्रपुर,जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर याना पत्र पाठवण्यात आले असताना देखील मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment