चंद्रपुर :-क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ व क्रांतीज्योती सावित्रीबाई पुणे महिला ब्रिगेड यांच्या संयुक्त वतीने महात्मा ज्योतीबा फुले सांस्कृतीक सभागृह बालाजी येथे युगस्त्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वि जयंती' तसेच माळी समाजातील 80 वर्षिय 36 जेष्ठ नागरिकांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष म्हणून गजानन गावंडे,उद्घाटक म्हणून नगरसेवक नंदू नागरकर,पाहूणे म्हणून राज बनकर (अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ,) वंदनानाई तीखे (नगरसेविका),डॉ राजश्री लेनगुरे, रामदासजी दानव (सचिव क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ),घनश्याम वासेकर (उपाध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ),बबनराव वासेकर (समाजसेवक),विजय राऊत,कांताबाई गुरुमाऊली,
प्रमुख वक्ता म्हणून सौ अल्काताई ठाकरे (जेष्ठशिक्षिका) यांची उपस्थिती होती.
प्रारंभी जोतिराव व सावित्रीबाईफुले यांच्या
प्रतिमेचे पुजन अतिथींच्या हस्ते करून माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले.
क्रांती ज्योती चंद्रपूर महिला ब्रिगेड जिल्हा ब्रिगेड तर्फे भारती बोबाटे ,संगीता तिवसकर,विजया कोरेकर,अंजू कोरेकर यांनी स्वागत गीताचे गायन केले. मंचावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात .
अर्चना (गावडे) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळीं नंदू नागरकर,अल्का ठाकरे गावंडे यांनीं सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन पुष्पलता बनकर,आणी संजीवनी चहारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार चंदाताई बनकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज युवा मंचचे. क्रांतीज्योती महिला ब्रिगेड जिल्हा कार्यकारिणी,क्षत्रीय माळी समाजसेवा मंडळाचे सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment