चंद्रपुर :-नुकतेच अकोला महानगरपालिकेतील 139 नियम ठराव रद्द करण्यात आले. तसेच या महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले.त्यामुळे या महानगरपालिकेतील 53 सदस्य व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची तलवार टांगलेली आहे.भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे विधान परिषदेचे आमदार बाजोरिया यांची चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी नागपूर येथे भेट घेऊन चंद्रपूर महानगरपालिकेतील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामातील घोटाळा,भोजन घोटाळा, जल मापक यंत्रे बसवण्याच्या कामातील भ्रष्टाचार,अमृत पाणीपुरवठा योजना, प्रसिद्धीचे काम,कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा इत्यादी कामातील गैरव्यवहार याविषयी माहिती दिली.
देशमुख यांनी अकोला महानगरपालिकेप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणाविरोधात शासनस्तरावर सहकार्य करण्याची विनंती यावेळी आमदार बाजोरिया यांना केली.चंद्रपूर महानगरपालिकेतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये नियम डावलले गेले असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार बाजोरिया यांनी दिली.तसेच या सर्व प्रकरणांमध्ये स्थायी समिती व आयुक्तांनी अधिकाराचा गैरवापर केला.महापौर यांचेकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी सदर गैरप्रकार किंवा भ्रष्टाचारा विरुद्ध चौकशी किंवा कारवाई करण्याचे टाळले. महापौर यांनी अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराची पाठराखण करून महानगरपालिकेला आर्थिक नुकसान करण्यामध्ये हातभार लावला.त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे असे मत आमदार बाजोरिया यांनी व्यक्त केले. या सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात शासन तसेच न्यायालयाच्या स्तरावर पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी म जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांना दिले.
0 comments:
Post a Comment