Ads

समाजाच्या विकासाकरिता मतभेद विसरून एक यावं : खासदार बाळू धानोरकर.


वणी : समाजात महत्वाचा घटक असणारा कुणबी समाजाचा देशासह राज्यात मोठा वर्ग असून प्रत्येक क्षेत्रातील युवक युवतींच्या प्रगतीसाठी व समाजाच्या विकासाकरिता कोणी कोणत्याही पक्षात असो समाजहितासाठी हेवेदावे विसरून सर्वानी एक येण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते धनोजी कुणबी समाज भवन वणी येथे ऑनलाईन राज्यस्तरीय उपवर - उपवधू स्मरणिका प्रकाशन सोहळ्यानिमित्य बोलत होते.

यावेळी नगर परिषद वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ सचिव डॉ. अशोक जीवतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ अध्यक्ष टीकाराम कोंगरे, दि. वसंत जिनींग अँण्ड प्रेसिंग कंपनी अध्यक्ष ऍड. देविदास काळे, पंचायत समिती सभापती संजय पिपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे, विजय पिदूरकर, संजय निखाडे, अनंत एकरे, लिखताई विधाते, संजय खाडे, प्रभाताई खाडे, जगदीश ढोके, प्रमोद वासेकर, अजय धोबे, जगदीश ढोके, डॉ. जगत जुनगरी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, उद्याची चांगली पिढी घडविण्यासाठी तरुणांनी शिक्षित होण्यासोबतच संस्कारित होण्याची गरज आहे. त्यासाठी भावी जोडपे शोधताना रंगरूप न बघता एकमेकातील संस्कार आणि कार्यकर्तृत्व बघावे. त्यामुळे समाज प्रगल्भ होण्यास मदत होईल. कुटुंब संस्कारित जर झाला तर हा संपूर्ण कुणबी समाज सुसंस्कारित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment