Ads

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या माध्यमातून बांबू व्यावसायिकांचे विविध प्रश्न मार्गी ..

MP, MLA Dhanorkar solves various problems of bamboo traders
चंद्रपूर :- वनसंपदेने संपन्न चंद्रपूर जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बुरड समाज बांधव बांबू पासून साहित्य तयार करून उपजीविका भागवीत असतात. परंतु ओला बांबू उपलब्ध नसल्यामुळे बुरड समाजाच्या व्यवसायावर संकट कोसळले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांच्याशी बैठक घेऊन बांबू कामगाराच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावला. यामुळे हजारो बुरड समाज बांधवाना ओला बांबू उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी रवी ठाकरे, बाळू भागोपे, अनिल रायपुरे, अनंत ठाकरे, आत्माराम तावडे, प्रमोद देवगडे, विलास कातकर, परमेश्वर गेडाम यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात मोठ्या संख्येत बांबू नॉन बफर क्षेत्रात उपलब्ध आहे. परंतु वन विभागाच्या जाचक अटीमुळे तेथील बांबू तोडायची परवानगी नसते. त्यामुळे आता नॉन बफर क्षेत्रात बांबू कटाईची परवानगी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर सकारात्मक निर्णय मिळण्याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. त्यासोबतच जिल्ह्यात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी टी. पी देण्यात यावी जेणेकरून बांबू व्यावसायिकांना अडचण निर्माण होणार नाही, बांबू व्यवसायिकांना व्यवसायाकरिता हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावा, बांबू कटाईसाठी बांबू व्यवसायिकांच्या मजुरांना काम द्यावे अशा विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली. हे सर्व प्रश्न जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मार्गी लावले आहे. आता शेतातील हिरवा बांबू सहज बांबू व्यावसायिकांना मिळणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment