एड.योगिता रायपुरे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कविसंमेलनाचे भारदस्त सूत्र संचालन नरेंद्र सोनारकर यांनी केले.कवी संमेलनात कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्यात ."वाटलं नव्हतं मी कधी मला उंच आकाशी झेप घेणार,
अलगद आकाशानेही हसत म्हटलं
तुझे प्रयत्न खूप छान
त्यामुळे हरवले माझे भान
तु येऊ नको गवसणी घालायला
आता मी च येणार तुला भेटायला..." या शब्दात आपल्या शिक्षिकेला मयुरी आराम हिने आपली कविता समर्पित केली.
"सांभाळून ठेवा तुमची शस्त्र, आता
मी लेखनी घेऊन निघाले आहे..."कवियत्री सीमा भासारकर यांनी अशा शब्दात हिंसा घडवणाऱ्यांना वार्निंग दिली.
तर अक्षय देशमुख या युवा कवीने आपल्या बदलाव या कवितेत वर्तमान शिक्षणव्यवस्थेवर हल्ला बोलला "कलतक जो हो न सका
वो आज होना चाईए,
सरकार तो बदल चुकी,
ये सिस्टम बदलना चाईए" म्हणत तीक्ष्ण हल्ला केला.
कवियत्री हेमा लांजेकर यांनी
"शाळा बंद झाली,
विचार तुम्ही करा ना,
साहेब आमच्या मोबाईल मध्ये
नेट पॅक भरा ना" म्हणत ऑनलाइन शिक्षणावर तशोरे ओढले.कवियत्री सविता भोयर यांनी क्रांतीज्योति सावित्री फुले वर सुंदर रचना सादर केली.युवा कवी विशाल शेंडे यांची " तू संघर्ष करशील का?" या कवितेने विचार करायला भाग पाडले.
कवी संमेलनाच्या अध्यक्षा एड.योगिता रायपुरे यांनी पत्रकारितेत काळा नुसार होत असलेला बदल हेरून
" पत्रकारांच्या लेखनीने आता पुन्हा जागलं पाहीजे
अश्यांनाच आधी वठणीवर आणलं पाहीजे...
सत्याची साथ देणारे, हक्क न्याय अधिकारासाठी
राण उठवणारे, ते आवाज ती लेखनी
तुमच्या आस्तित्वा सारखीच
सदैव बुलंदच राहीली पाहीजे....
सदैव बुलंद राहीली पाहीजे.."
अशी वर्तमानातील पत्रकारिता आपल्या कवितेतून मांडली.जेष्ठ कवी विजय भासारकर यांनी आपल्या 'भगवा' या कवितेतून भगव्या रंगाचे महात्म्य विशद केले-
"बुद्ध धम्म की पहचान है भगवा,
भारत के राष्ट्रध्वज की शान है भगवा.." असे कवितेतून मांडतांना भगवा रंग समता, स्वतंत्र,बंधुतेशी कसा निगडित आहे,हे विशद केले.जेष्ठ कवियत्री मृणाल कांबळे यांच्या कवितेने वातावरण भारावून गेले.
'लेखणी म्हणते काय लिहू?'या कवितेत "
लेखणी म्हणते सांग
काय लिहू
वाटेवरच्या काचा.
रक्तबंबाळ पाय लिहू
फुलांवर लिहू पानांवर लिहू
हळव्या प्रितीच्या स्पदंनांवर लिहू
सांग काय लिहू
सारं सारं छान लिहू
की वेदनांची रांग लिहू
आक्रोश लिहू विद्रोह लिहू
सांग काय लिहू" असे विदारक प्रश्न उपस्थित करत इथल्या भयंकर व्यवस्थेवर प्रहार केला.
संगिता घोडेस्वार यांनी परिवर्तनवादी कवीता, अस्मिता वाघमारे यांनी शेतक-यांची व्यथा मांडली तर सोनाली कवाडेनी मतदानाचे महत्व विशद केले..रंगशाम मोडक यांनी वास्तवादाशी सामना करणारी व अतुल येरगुडे परिस्थितीला बदल इत्यादीं विषयांवरील कवींच्या कविताही लक्षवेधी ठरल्या...
दुसऱ्या सत्रात कवियत्री सविता भोयर,सुजय वाघमारे,मनोज मोडक, विकास दुपारे यांचा गौरव करण्यात आला.एड.राजेश सिंग यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन निलेश ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,प्रबोधनकार ठाकरे,प्र.के.अत्रे,गौरी लंकेश यांच्या प्रतिमांना पुष्पहार टाकून कार्यक्रमाला सुरवात झाली.कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध कवियत्री सीमा भासारकर यांनी केले.तर आभार मृणाल कांबळे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली....
0 comments:
Post a Comment