भद्रावती तालुका प्रतिनिधी(जावेद शेख):-
श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्वर्यू स्व. श्री जगन्नाथजी गावंडे यांचा द्वितीय स्मृतीदिन सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधुन, स्वच्छता अभियान व श्रध्दांजली कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात दि. २० जानेवारी २०२२ रोजी सुरक्षा नगर येथिल प्रार्थना मंदिरात संपन्न झाला.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक तसेच भद्रावती येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. जगन्नाथजी गावंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सामुदायिक ध्यान झाली. त्यानंतर परिसरातून रामधुन काढण्यात आली त्यामध्ये स्वच्छता अभियान राबवीत परिसरातील नागरीकांनी आपापल्या घरासमोर स्वच्छता करीत घरासमोर रांगोळी व महापुरुषांचे फोटो ठेवुन मार्ग सुशोभित करण्यात आले. रामधुन प्रसंगी बाबारावजी नागोसे यांचे अध्यक्षतेखाली वासुदेवजी सुकारे यांचे प्रमुख उपस्थितीत साै. सुवर्णाताई पिंपळकर व साै. शुभांगीताई कुत्तरमारे यांनी मार्गदर्शन केले.
सायंकाळी भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली व त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगतामध्ये स्व. जगन्नाथजी गावंडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकीत आपल्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी केशवानंद मेश्राम महाराज, चंद्रकांतजी गुंडावार, बालाजी नागपूरे, गोपालराव ठेंगणे, सौ. उर्मिला बोंडे, रमेश काळे, अमित गुंडावार, सौ. उषाताई आखाडे, रामकृष्ण कुबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्व. जगन्नाथजी गावंंडे यांचे स्मृती प्रित्यर्थ गावंडे परिवाराचे वतीने बालसुसंस्कार शिबीर शाश्वत योजने करीता ५० हजार रुपयाचा धनादेश मंडळाकडे सुपुर्द करण्यात आला तसेच याप्रसंगी बाल सुसंस्कार शिबीर शाश्वत योजनेत श्री मधुकररावजी धाबेकर यांनीसुद्धा १० हजार रुपयाचा संकल्प केला.बाल सुसंस्कार शिबिर करीता गावंडे परिवराचा वतीने50हजार रूपयाचा निधि देण्यात आला
शेवटच्या मौन श्रध्दांजली कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्पगीताने होऊन विधाता मृत्यु हो ऐसी या राष्ट्रसंताच्या भजनाने स्वरांजली अर्पण करुन त्यानंतर सर्व उपस्थितांनी काहि वेळ मौन पाळत श्रध्दांजली अर्पण केली. आरती व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत दादा भद्रावतीकर व आभार विशाल गावंडे यांनी केले.
0 comments:
Post a Comment