चंद्रपुर :-पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हददीतील जटपुरा गेड वार्ड कं. २ चंद्रपुर येथे मुलीचे विनयभंग करणाच्या आरोपीस दि.२४/०१/२०२२ रोजी मा. श्री. ए. व्ही. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपुर यांनी पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील जटपुरा वार्ड कं. २ येथील फिर्यादी ही आपले राहते घराचे टेरिसवर आई वडीलासह झोपुन असताना आरोपी हा त्यांचे टेरिसवर जावुन फिर्यादीची छाती दाबुन तिचा विनयभंग केला. असा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व मेडीकलवरुन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप कं. ४९९/२०१९ कलम ३५४ (अ) (१),४५२ भा.द. वी. सहकलम ७,८ बा.लै. अ. अधीनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर महीला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता नागपुरे यांनी आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक २४/०१/२०२२ रोजी आरोपी नामे अक्षय उर्फे घरडे, वय २४ वर्षे रा. पंचशिल चौक जटपुरा वार्ड चंद्रपुरयास कलम ३५४,३५४ (अ) (१) भादवी व कलम ८ पोक्सो अतंर्गत ५ वर्ष कारावासाची शिक्षा, आणि २५०० / - रु दंड व दंड नं भरल्यास ६ तहीने अतिरिक्त कारावास तसेच कलम ४५२ भांदवी मध्ये २ वर्षे कारावासाची शिक्षा तसेच १५०० / - रु दंड व दंड न भरल्यास ६ महीने अतिररिक्त कारावासाची अशी शिक्षा मा. श्री. ए. व्ही. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. देवेंद्र महाजन, सहा. सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर आणि कोर्ट पैरवी म्हणून पोहवा. संतोष पवार, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांनी काम पाहिले.
0 comments:
Post a Comment