Ads

देशी दारूच्या नवीन दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा - काँग्रेस

Revoke the permission given to the new liquor shop - Congress
घुग्घुस :- जिल्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध कामगार नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे.
सात वर्षाच्या बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री शुरू झाल्याने शहरात देशी - विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे.

शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में.चिर्यस प्रा.लि.उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून

सदर दुकान हे घुग्गूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे.
याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे.

व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे.
याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.

करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्गूस शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता व गेल्या वर्षी आगस्ट महिन्यात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले होते.

असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली सदर तातळीने रद्द करावी या करिता किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले व परवानगी रद्द न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही काँग्रेसने दिला.

याप्रसंगी घुग्गूस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रशांत सारोकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment