Ads

भद्रावती बसस्थानकावर पोलिस मदत केंद्राची मागणी; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

भद्रावती प्रतिनिधी (जावेद शेख) : शहरातील बसस्थानक परिसरात वाढत्या गैरप्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन भद्रावती यांना निवेदन देत बसस्थानक परिसरात सायंकाळपासून शेवटच्या बसपर्यंत पोलिस मदत केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
Demand for a police help center at Bhadravati bus stand; Statement from Vanchit Bahujan Aghadi for the safety of passengers
भद्रावती हे पर्यटन व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे ऐतिहासिक व धार्मिक स्थळांसह आयुध निर्माणी चांदा व कोळसा खाणी आहेत. त्यामुळे दररोज विविध ठिकाणांहून हजारो प्रवासी बसस्थानकावर ये-जा करतात. तसेच ग्रामीण भागातील अनेक गावे भद्रावतीशी जोडलेली असल्याने ग्रामीण नागरिकही बससेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
मात्र, संध्याकाळनंतर बसस्थानक परिसरात मद्यधुंद व्यक्तींचा वावर वाढत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे महिला, युवती, जेष्ठ नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना बसची वाट पाहताना असुरक्षित वाटत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक प्रवासी त्रास सहन करत असले तरी भीतीपोटी तक्रार करत नाहीत, अशीही बाब पुढे आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलिस मदत केंद्र सुरू करावे, अशी मागणी शहराध्यक्ष स्वप्निल सूर्यभान कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. यावेळी विविध पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment