चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत Chhatrapati Shivaji Maharaj यांची तुलना Tipu Sultan यांच्याशी केल्याच्या विधानाविरोधात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संबंधित वक्तव्याबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
Under the leadership of Kishor Jorgewar, the BJP stages a strong protest in Chandrapur; sharp condemnation of the statement made by Maharashtra Congress President Harshvardhan Sapkal.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तुषार सोम, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, रवी गुरुनुले, महामंत्री नामदेव डाहुले, श्याम कनकम, बलराम डोडाणी, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, दिनकर सोमलकर, नगरसेविका शीतल गुरुनुले, ज्योती जिवने, सरला कुळसंगे, अॅड. सारिका संदुरकर, आशा देशमुख, नगरसेवक भालचंद्र दानव, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, महिला महामंत्री सायली येरणे, घुग्घुस नगरसेवक आशिष मासिरकर, उमेश आयलु, प्रज्ञा बोरगमवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रविण गिलबिले, शशिकांत मस्के, चंद्रशेखर देशमुख, करणसिंह बैस, दीपक पाठक, अभिनव कोरकोपुलवार, अंकुश मडावी, अनिष दीक्षित, देवा कुंटा, आशू फुलझेले, रेश्मा पांडे आदी उपस्थित होते. घोषणाबाजी करत संबंधित विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान, धर्मरक्षण आणि रयतेचे लोकाभिमुख राज्य उभे केले. अशा युगपुरुषाची तुलना परकीय आक्रमक प्रवृत्तीच्या शासकाशी करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी व इतिहासाचा अवमान करणारी बाब आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा अपमान कदापि मान्य नाही.”
0 comments:
Post a Comment