चंद्रपूर :- अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्वला गॅसची सब्सिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने आमदार तथा उपाध्यक्ष प्रदेश महिला काँग्रेस कमिटी प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात रविवारी दुपारी तीन वाजता, वरोरा येथील आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येणार आले. यावेळी उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शहर काँग्रेस महिला अध्यक्षा दीपाली माटे, शहर काँग्रेस महिला उपाध्यक्ष मीना रहाटे, नगरसेविका चंद्रकला चिमुरकर, शिरोमणी स्वामी, प्रतिमा जोगी, सरपंच बोर्डा यशोधा खामणकर, प्रिया भोयर, उज्वला थेरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले कि, महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे काम केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्वला योजनेमार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्वला योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी आता सिलेंडर अडगळीत टाकले असून त्या महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल ६९ वेळा प्रेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. सरकारने भाववाढीचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment