भद्रावती,दि.१७ (तालुका प्रतिनिधी):- विद्युत धक्का लागून आजारी झालेल्या माकडाच्या पिल्लाला येथील वन्यजीवप्रेमींनी जीवदान दिल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दि.१७ जानेवारी रोजी सकाळी गवराळा वार्डातील निंबाळकर यांच्या घरी माकडाच्या पिल्लाला विद्युतचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ते पिल्लू खाली पडले व ते आजारी झाले. या घटनेची माहिती वन्यजीवप्रेमी तथा नेफडो संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांना देण्यात आली. बाकरे लगेच घटनास्थळी गेले व त्यांनी त्या पिल्लाला सोबत घेऊन येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात दाखल केले. तेथे त्या पिल्लावर पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.रोडे यांनी उपचार केले. त्यानंतर वनविभागात रीतसर नोंदणी करुन त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी बाकरे यांना वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे, क्षेत्र सहाय्यक हनवते, दीपक निंबाळकर, प्रणय पतरंगे, शुभम मुरकुटे, सुमीत बोडे यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment