Ads

दर रविवारी भरणारे "संडे मार्केट'' बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

Municipal Commissioner orders to close "Sunday Market" which is held every Sunday
चंद्रपूर :- शहरातील आझाद बगीचाजवळ दर रविवारी भरणाऱ्या संडे मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्गमित केलेल्या निर्बंधांनुसार दि. ३० जानेवारी २०२२ व ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्णतः बंद ठेवण्यात यावे, असे आदेश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता काही महिन्यापूर्वी संडे मार्केटवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या काळात लाकडाऊन मध्ये हे मार्केट बंद होते. मात्र, टाळेबंदी उठताच पुन्हा संडे मार्केट सुरु झाले. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने निर्गमित केलेल्या निर्बंधांनुसार दि. ३० जानेवारी २०२२ व ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्णतः बंद ठेवण्यात यावे, असे आदेश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment