चंद्रपूर :- शहरातील पर्यावरण संस्था इको-प्रो कडुन आज प्रजासत्ताक दिनापासुन ‘‘मेरा हक! साफ हवा’’ या इको-प्रो ‘शुध्द हवा, माझा हक्क’ या अभियानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते रामाळा तलाव परिसरात एकत्रीत येत सदर अभियानाची सुरूवात करित परिसरात जनजागृती केली.
‘मेरा हक! साफ हवा’ my Right , Pollution free Air अभियानाची सुरूवात मुळातच चंद्रपूर शहरात कुत्रीम फुफ्फुस लावुन झालेली आहे. चंद्रपूरात हे फुफ्फुस मात्र राज्यातील इतर शहराच्या तुलनेत अवघ्या सहा दिवसात काळे पडले होते. यावरून चंद्रपूर शहराची हवेचा दर्जा कितपत खालावलेला आहे या निमीत्ताने समजुन आला. येथील नागरीक मागील दोन दशकापासुन या प्रदुषणाचा गंभीर अनुभव घेत असुन, गेल्या अनेक वर्षात आपल्या आजारावर जे रूग्णालय व औषधांच्या खर्चात वाढ झालेली आहे ही प्रदुषणाची देण आहे. मानवाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र व निवारा बोलेले जाते मात्र प्रदुषीत शहरात नागरिकांच्या निरोगी आरोग्याकरिता शुध्द हवेची गरज सुध्दा यात समावेश करावा लागेल.
शहरातील दिवसागणिक वाढत्या प्रदुषणामुळे येत्या काळात चंद्रपूर हे आजारी लोेकांचे शहर म्हणुन नावारूपास यायला वेळ लागणार नाही. याकरीता शाशन, प्रशासन, विवीध उदयोगासह आपण सारे नागरीक चंद्रपूरकर सुध्दा आता जाागे होण्याची वेळ आहे. प्रदुषण नियंत्रणाबाबत ज्यांची जी जवाबदारी आहेत त्यांनी ती समर्थपणे पार पाडणे अत्यावश्यक आहे. तसेच संबधीत यंत्रणेला येथील प्रदुषण कमी करण्यास भाग पाडणे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, नियमांचे कठोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच नागरीकांनी शुध्द हवेसाठी आग्रही राहावे यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
चंद्रपुर शहरात स्वच्छ हवा कार्ययोजनेची अमलबंजावणी व्हावी
नुकतेच एनजीटी च्या ऑर्डर नुसार सिटीपीएस चे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे. प्रदुषण नियंत्रण बोर्डच्या अहवालानुसार चंद्रपूर शहरात मानकापेक्षा अधिक प्रदुषण नेहमीच असतात, मागील वर्षभरात 250 पेक्षा दिवस कमी-जास्त पण प्रदुषणांचे होते, शहरात नुकतेच लावण्यात आलेले कुत्रीम फुफुस सुध्दा सहा दिवसात काळवडंले होते. सिटीपीएस सोबतच शहर व लगतच्या भागात प्रदुषण वेकालीकडुन, महानगरपालीका क्षेत्रात धुळीचे, घरगुती कोळशा शेगडी, टायर, कचरा जाळल्याने होत असते यावर सुध्दा आळा घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून कड़क अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शहरात सुद्धा क्लिन एअर अॅक्शन प्लान ची अमलबंजावणी सोबतच काही महत्वाचे निर्णय महानगरपालीकेकडून घेण्याची गरज आहे.
सदर अभियान अंतर्गत इको-प्रो प्रशाशकीय पातळीवर, स्थानिक जनप्रतिनीधी यांचेकडे पाठपुरावा करणे, नागरीकांमध्ये जनजागृती करण्यास विवीध अभियान राबविणे असा व्यापक कार्यक्रम राबविला जाणार आहे. आज अभियानाच्या सुरूवातीला इको-प्रो संस्थेचे बंडु धोतरे यांचेसह पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, अब्दुल जावेद, अभय अमृतकर, सुधिर देव, संजय सब्बनवार, जयेश बैनलवार, सुनील पाटील, आकाश घोडमारे, राजेश व्यास, सौरभ शेटे, राजु काहीलकर, शंकर पोईनकर, कपील चौधरी, सचिन धोतरे, प्रितेश जिवणे, भारती शिंदे, मनिषा जयस्वाल, खुशबु जयस्वाल आदी सहकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment