चंद्रपूर : जन्मताच कुणीच गुन्हेगार नसतो. परस्थितीमुळे न कळत हातातून गुन्हा घडत असतो.मग जेलची हवा खावी लागते.कैद्यांना शिस्त लागावी यासाठी काही बंधने जेल मध्ये पाळली जातात.त्यातून जगणे निरस होवून जाते.निरस झालेल्या जगण्यात मनोरंजनाचा छिटकारा टवटवीतपणा बहाल करतो. खासदार बाळू धानोरकर यांनी कैद्यांचा मनोरंजनासाठी टिव्ही संच दिला. यातून कैद्यांचा ओठावर नक्कीच हसू फुलणार आहे.
गुन्हेगाराची प्रवृत्ती बदलली पाहिजे. प्रत्येक माणूस हा स्वभावता गुन्हेगार नसतो परिस्थितीमुळे चुकीच्या मार्गदर्शनामुळे, संगतीमुळे तो गुन्ह्याकडे वळतो. त्याच्याकडून गुन्हा घडतो. पण प्रत्येकामध्ये चांगुलपणा असतो तो दाखवणे व नव्याने नवीन पद्धतीने जीवन जगण्याचा संकल्प करणे महत्वाचे आहे. पश्चाताप झाल्यानंतर जीवन नक्कीच चांगल्या पद्धतीने जगू शकले समाजाने गुन्हेगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. आज जिल्हा कारागृह येथील कैद्यांकरिता मर्दानी महिला आस्था मंच चंद्रपूर यांच्या मागणीची दखल घेत खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून, दोन टीव्ही संच देण्यात आले. याप्रसंगी बोलत ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, डॉ. रजनीताई हजारे, जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप, तुरुंग अधिकारी महेश माळी, नंदाताई अल्लुरवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, अशोक मत्ते, ऍड. विद्याताई मसादे, अफसाना सैय्यद, अनुराधा जोशी, शोभाताई महतो, तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, आयुष्यात झालेली एक चूक माणसाचे आयुष्य खराब करते. कारागृहात आल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची गरज असते. प्रत्येकाची येथून निघण्याची इच्छा असते. आपण मोकळे आयुष्य जगावे त्याकरिता आयुष्यातून केलेली चूक दुरुस्त करूनच निघायला हवे असे उद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी माजी मंत्री शोभाताई फडणवीस म्हणाल्या कि, कैद्यांच्या प्रबोधनासाठी व मत परिवर्तन करण्यासाठी चांगले कार्यक्रम बघता यावे याकरिता मर्दानी महिला आस्था मंच चंद्रपूर तर्फे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे दोन टीव्ही संचाची मागणी केली होती. त्यांनी तात्काळ मान्य करीत एका आठवड्यातच हि मागणी मान्य केली. त्या पुढे म्हणाल्या कि, आपले वर्तमान आपल्या भविष्यात चांगले वाईट परिणाम घडवणारे असते. म्हणून आतापर्यंतच्या जीवनाचा विचार न करता येथून पुढचे जीवन चांगले व समाधानी जगा, शिक्षा संपल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करा एकमेकांना मदत करून परोपकाराची कामास लागलीस सुरवात करा. आयुष्य खूप सुंदर आहे. चांगल्या पद्धतीने जगा असे प्रतिपादन त्यांनी केले.
0 comments:
Post a Comment