Ads

10 लाखाची खंडनी मांगणाऱ्या RTI कार्यकर्त्यास स्थानिक गुन्हे शाखाने ठोकल्या बेड्या

चंद्रपुर :-यातील फिर्यादी उपकार्यकारी अभीयता महावितरण गडचांदुर जि. चंद्रपुर यांना आरोपी सौरभ विजय बुरेवार चंद्रपुर याने माहीती अधिकार अंतर्गात माहीती मागवुन बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तक्रार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व आधीची तक्रार वापस घेने याकरीता १० लाख रुपये खंडणीची मागणी करीत होता परंतु फिर्यादी यांना त्यांना पैसे देन्याची इच्छा नसल्याने त्यांनी  पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर याना भेटुन तक्रार केली त्यावरून  पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कार्यवाही करण्याचे आदेश दील्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोउपनि अतुल कावळे यांना टीम सह सापळा कार्यवाही करुन आरोपीला रंगेहात पकडन्याचे आदेश दील्याने फिर्यादी उपकार्यकारी अभीयंता महावितरण याना भेटुन आरोपी याने खंडणीची मागणी केल्याची खात्री करून आरोपी याने फिर्यादीस दीनांक १० ०२/२२ ला रोमा बार बेबी लॉन चंद्रपुर येथे भेटायला येणास सांगितले. तेव्हा रोमा बार बेबी लॉन चंद्रपुर येथे पोउपनि अतुल कावळे यांनी दोन सरकारी पंच व स्थानिक गुन्हे शाखा टीम सह येथे जावुन सापळा रचला त्यानंतर आरोपी सौरभ बुरेवार फिर्यादीस बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तक्रार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व केलेली तक्रार मागे घेण्याकरिता तडजोडीअंती ५ लाखची मागणी करून टोकन म्हणून ५०,०००/ रुपये खंडणीच्या स्वरुपात घेताच त्याला खडणीच्या रक्कमे सह रंगेहात पकडन्यात आले. व आरोपीस ताब्यात घेवून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध कमाक ११५/२०२२ कलम ३८४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी मा.  अरविंद साळवे पोलीस अधिक्षक, चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाड़े स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ. पंडीत वरहहाडे, नापोशि मिलींद चव्हान, अनुप डांगे, जमिर पठान, संतोष येलपुलवार, दीपक डोगरे, नितेश महात्मे, पोशि प्रमोद कोटनाके, मयुर येरणे सायबर सेल येथील पो हवा. अली मेजर, पोशि भास्कर यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment