Ads

*सिंदेवाही बास्केटबॉल ॲकेडमी च्या अंडर-14 ने पटकाविला प्रथम क्रमांक


सिंदेवाही प्रतीनिधी:-स्थानिक सिंदेवाही येथील एस बी ए अंडर-14 युवा टीम ने गडचिरोली येथे पार पडलेल्या बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2022 या बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सिंदेवाही तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल इंटरनेट वरील खेळांना जरी प्राधान्य असले तरी मैदानी खेळांचे आकर्षण अजूनही असून शहरी भागात आता मैदानी खेळांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. सिंदेवाही मधील सर्वोदय महाविद्यालयाच्या पटांगणावर दररोज सराव करणारी सर्व मुले ही सिंदेवाही येथील रहिवासी असून त्यांच्या या यशाबद्दल सिंदेवाही तथा परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे. स्पर्धेत माहीर पठाण,मोहित चौधरी,श्रमाय वालदे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या यशाचे श्रेय प्रशिक्षक म्हणून निनाद शेंद्रे,मार्गदर्शक प्रा.लेमदेव नागलवाडे सर,विनय खोब्रागडे सर,मोगरे सर संतोष खोब्रागडे सर तथा सिंदेवाही बास्केटबॉल ॲकेडमी चे सदस्य अनिल दाजगाये,.राहुल खांडेकर, प्रीती दोनाडकर,वैभव सोनकर,सुरज अष्टकार, रोहित सोनुले आणि अकॅडमीच्या इतर सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment