Ads

मार्कंडा देवस्थान येथील यात्रेसह जिल्हयातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा जत्रा रद्द

गडचिरोली,(जिमाका)दि.27:- जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, संजय मीणा गडचिरोली यांनी दिनांक 08 जानेवारी च्या शासन निर्देशाप्रमाणे तसेच उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना अंतर्गत गडचिरोली जिल्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा जत्रा रद्द केल्या आहेत. तथापि सदर मंदिरामध्ये 50 लोकांच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवाणगी असेल. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे जबाबदारी संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आली आहे.
लसीकरणाबाबत कोविड बाबत सूट देणेकरीता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनूसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ अ मधे समाविष्ट नाही. गडचिरोली जिल्हयातील नागरी, ग्रामीण तसेचे औद्यौगिक क्षेत्रातील जनतेस, व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशुन आदेशान्वये कोविड तरतुदी या जिल्हयात लागू आहेत. तथापि सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने, रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली तरी सुध्दा विशेषत: मार्कंडादेव व चपराळा येथील तसेच इतर ठिकाणी भरणाऱ्या धार्मिक यात्रा जत्रांचा विचार करता दिनांक 01 मार्च, 2022 पासुन महाशिवरात्री निमित्त यात्रा जत्रा भरल्यास मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदरील आदेशाचे पालन न करणारी उल्लघंन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2055 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे संजय मीणा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,गडचिरोली यांनी कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment